पुण्यात पहिल्यांदाच महानाट्या मधून उलगडणार श्री बालाजींचा इतिहास
पुणे : गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्यदिव्य असे 'श्री बालाजी महानाट्य - इतिहास, लीला आणि समर्पण' आयोजित करण्यात येत आहे. या हिंदी महानाट्याचे सादरीकरण भव्य अशा 5 मजली रंगमंचावर होणार आहे. तर यामधील 250 कलाकार, 70 हून अधिक नृत्य कलावंत, घोडे, रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचे खास आकर्षण असणार आहे. या महानाट्यातून उभारला जाणार निधी मंदिर निर्माण आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे, अशी माहिती या महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲड. सनी रवींद्र कोळपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विशाल धुमावत म्हणाले की, गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच श्री बालाजींचा इतिहास उलगडवून दाखवणारे महानाट्य सादर होणार आहे. हे महानाट्य चोरडिया कॉर्नर, शांती नगर, कोंढवा येथील मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी असे 4 दिवस सायंकाळी 5 वा. सादर होणार आहे. या महानाट्यासाठी 120 फुट लांब आणि 60 फुट ऊं...